मॅनहोलप्रकरणावरुन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी थेट राजीनाम्याची मागणी केल्याने महायुतीत उघड वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी संपूर्ण घडलेल्या घटनेबाबत आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे म्हणत अश्विनी भिडेंची पाठराखण केली आहे.त्यामुळे हा वाद आता कुठे जाऊन पोहोचतो, हे पाहावे.