Ratnagiri| चिपळूणमध्ये NDRF ची टीम दाखल; एनडीआरएफचे 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना वेग दिला आहे. चिपळूण शहरातील संभाव्य पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफचे पथक बुधवारी रात्री उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. या पथकात 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांचा समावेश आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून प्रशासनही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ