दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; नवे 8 नियम लागू; तर गोरस भंडार प्रकरणात तुकाराम मुंढेंना झटका

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता काही खैर नाही. कारण महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे ८ नियम लागू करण्यात आले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. उघड्या कॅनमधून ओतून दिलेलं सुटे दूध आता बेकायदेशीर ठरणार आहे. परवानाधारक विक्रेत्यालाच सुटे दूध विकता येणार आहे. तसंच आइस्क्रीम, कुल्फी यावर सुद्धा काय वापरत आहेत ते स्पष्टपणे लिहिणं आवश्यक आहे. वर्ध्यातील गोरस भंडार प्रकरणात तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाला मोठा झटका बसला आहे.गोरस भंडारला तात्काळ टाळे ठोकण्याच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर एफडीएने माघार घेतली आहे.

संबंधित व्हिडीओ