Nashik Ganeshotsav 2025 | नाशिकमध्ये बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

नाशिक गणेशोत्सव 2025: लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे 4 दिवस उरले आहेत. गणेशोत्सवापूर्वीच्या शेवटच्या वीकेंडला बाप्पाच्या मूर्तींचे बुकिंग करण्यासाठी शनिवारच्या रात्री उशिरापर्यंत मूर्तींच्या स्टॉलवर गणेशभक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली. यंदा मूर्तींच्या किमतीत वाढ झाली असली तरी, भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये. कुटुंबीयांसोबत गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती निवडण्यासाठी दाखल झाले होते.

संबंधित व्हिडीओ