बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी आतुर झाले आहेत. वसई-विरार-नालासोपारा परिसरातून जवळपास अडीच ते तीन हजार एसटी बस गाड्या गणपती सणानिमित्त कोकणात जाणार आहेत.