"मतांची चोरी करूनच सगळे सत्तेवर आहेत," असे गंभीर विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. राज ठाकरे यांनी सांगितले की, ते २०१६ पासून मतांमध्ये गडबड असल्याचा मुद्दा मांडत आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास गेल्या १०-१२ वर्षांचा खेळ उघड होईल. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात जाऊन मतदार याद्यांची सूक्ष्म तपासणी करण्याचे आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले.