भारतीय कसोटी क्रिकेटचा आधारस्तंभ मानला जाणारा चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या भक्कम बचावासाठी आणि संयमी खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने एक भावनिक पोस्ट लिहून क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.