मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २७ तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. त्याआधी बीडच्या बाला घाटावर त्यांची एक महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. सरकारला अंतिम इशारा देणाऱ्या या सभेसाठी जरांगे पाटलांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे.