मुंबईत कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी आणि त्यांच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर 'पेटा' (PETA - People for the Ethical Treatment of Animals) या प्राणी हक्क संस्थेने कबुतरांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे. 'आम्हीही मुंबईकर' अशा आशयाच्या जाहिराती त्यांनी विविध ठिकाणी, विशेषतः दादर कबुतरखान्याजवळ लावून लक्ष वेधले. कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतची भीती अतिरंजित असल्याचे सांगत, पेटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी कबुतरांची संख्या नियंत्रित करण्याचा एक 'मानवी' उपायही सुचवला आहे.