मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे एक निर्णायक बैठक होत आहे. या बैठकीतून सरकारला काही ठोस इशारा दिला जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करण्यापूर्वीची ही सभा मराठा समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. विशेष म्हणजे ही शेवटची निर्णायक बैठक मानली जात असून, जिल्हाभरातून हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.