Pune Ganeshotsav 2025 | पुणेकर बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. पुण्यात बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. यंदा बाप्पाला कापडी फेटे आणि आकर्षक दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत. 'बाल गणेश'पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पुण्यात बनवण्यात आल्या आहेत. पुणेकरांनी दोन महिन्यांपूर्वीच मूर्तींची बुकिंग केली असून, मूर्तीच्या दुकानात सध्या मोठी लगबग दिसून येत आहे. पुणेकर आपल्या लाडक्या आणि सुबक मूर्त्या घरी नेण्यासाठी उत्सुक आहेत.

संबंधित व्हिडीओ