अखेर डहाणूच्या सरावली उपकेंद्रातील डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.काही दिवसांपूर्वी NDTVमराठीने यासंदर्भात बातमी दाखवली होती. हाय रिस्क गरोदर महिलांच्या शिबिरात डॉक्टरच गैरहजर होते.हा प्रकार आशा सेविकांनी समोर आणला होता. या बातमीनंतर तातडीने पावलं उचलत प्रशासनाने कारवाई केली.डॉ. कुणाल सोनवणेंवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली.