दिल्लीत ऑडीने फुटपाथवरील 5 जणांना चिरडल्याची घटना समोर आली.नशेत असलेल्या चालकाने 5 जणांना चिरडले. दिल्लीच्या वसंत विहारमधील शिवा कॅम्पसमोरील ही घटना घडली. अपघातात 5 जण जखमी असून यात 8 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.5 जणांचं कुटुंब हे राजस्थानमधील असून ते दिल्लीत मजुरीसाठी आले होते.सध्या पोलिस पुढील तपास करत असून, घटनेच्या वेळी तिथे आणखी कोण-कोण उपस्थित होते आणि आणखी काही बेफिकिरी घडली का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.