बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडवर १५ गुन्हे दाखल असतानाही त्याला पोलिसांचं संरक्षण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.