Dharashiv| उमरग्यातील आजोबा गणपती ठरतोय विशेष आकर्षण, 100 हून अधिक वर्षांची परंपरा

धाराशिवच्या उमरगा शहरात असा एक गणराय आहे, ज्याला भाविक प्रेमाने “आजोबा गणपती” म्हणून हाक मारतात. शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेली ही गणेशमूर्ती आजही अनेक पिढ्यांच्या श्रद्धेची साक्ष देत उभी आहे. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र गणेश मंडळाने धार्मिक उत्सवासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाही जपला आहे. रक्तदान, वृक्षारोपण, ज्ञानवाटप, व्याख्यानमाला ते कोरोना काळातील अन्नदान अशा उपक्रमांतून मंडळाने समाजाशी आपले नाते अधिक दृढ केले. अनुभव, आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या गणरायामुळे उमरग्याच्या गणेशोत्सवात “आजोबा गणपती” हे नाव आज श्रद्धेचा आणि परंपरेचा मानबिंदू बनले आहे.

संबंधित व्हिडीओ