धारावीकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी.अपुरी कागदपत्रं किंवा अन्य कारणांमुळे, सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलीय. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशाने, धारावी पुनर्विकास प्रकल्पाने 'दस्तावेज संकलनासाठी' विशेष मोहिमेचं आयोजन केलंय. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ही मोहिम राबवली जाणार असून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या पात्र धारावीकरांना त्यांचे आवश्यक दस्तावेज डीआरपीसमोर सादर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.या मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सर्वेक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्येच सेक्टरनिहाय तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त रहिवाशांनी घ्यावा, असं आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलंय.