केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतून महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार निशाणा साधला आहे. "आम्हाला डबल इंजिन नव्हे, तर केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे," असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ झाला पाहिजे, अशी टीका केली. यासोबतच, "देशात कौटुंबिक राजकारणातले पक्ष चालणार नाहीत," असे स्पष्ट सांगत त्यांनी महाराष्ट्रातील घराणेशाहीवर देखील कठोर प्रहार केला.