प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर घरच्यांनी आरोप करणे दुर्दैवी असून, "तुम्ही आगाऊपणा करण्याची काय गरज होती," असा सवाल त्यांनी केला. प्रमोद महाजन यांची हत्या पैशासाठीच झाली, असा दावा त्यांनी केला. "तुम्ही विधवा असल्याचे व्हिक्टिम कार्ड खेळत आहात," असे म्हणत त्यांनी सारंगी महाजन यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.