अडीच महिने दडी मारल्याने शिरपूर तालुक्यात मक्याच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे..पाच एकरांत पूर्वी 100 पोत्यांहून अधिक मका मिळायचा, तिथे यंदा अवघी 40 पोती हाती आली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण झालंय. कापूस, सोयाबीन आणि मुगालाही दुष्काळाचा फटका बसलाय. त्यामुळे तातडीने पीक पंचनामे करून दिवाळीपूर्वी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Dhule Drought | Farmers in Shirpur face drought crisis; maize production drops by up to 60%.