Chakan MIDCसाठी दर शुक्रवारी जिल्हाधिकारी दरबार भरवणार, Uday Samant यांची Chakan मध्ये पाहणी

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या चाकणमध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांसह औद्योगिक वाहतुकीलाही मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेत खड्ड्यांची पाहणी केली. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक उपाययोजना आणि कामांना गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

संबंधित व्हिडीओ