हायकोर्ट क्लार्क पदाच्या टायपिंग स्किल टेस्टमधील तांत्रिक गोंधळ आता चांगलाच पेटला आहे. कल्याण एपीएमसी मार्केट येथील परीक्षा केंद्रावर संतप्त विद्यार्थ्यांनी थेट न्यायाधीशांची गाडी अडवल्याची घटना घडली आहे. कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश परविन सय्यद यांच्या वाहनाला परीक्षार्थ्यांनी घेराव घालत तब्बल दीड तास रोखून धरल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्यांमुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असून, याच संतापातून हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे