Nanded| तरुणांनी विकास कामांचा हिशेब मागितल्याने गोंधळ,ग्रामसभेत राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सवना गावात ग्रामसभेत जोरदार राडा झालाय... गावातील तरुणांनी विकास कामांचा हिशेब मागितल्याने गोंधळ उडाला.. त्यानंतर आक्रमक झालेल्या तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.. पोलिसांनी लाठीचार्ज केलेले व्हीडिओ आता व्हायरल होताय... त्याचबरोबर ग्रामस्थांनी या दडपशाहीचा निषेध नोंदवलाय. ग्रामसभेत पोलिसांची गरजच काय असा सवाल आता उपस्थित केल्या जातोय. या घटनेमुळे सध्या सवना गावातील वाद चव्हाट्यावर आलाय.

संबंधित व्हिडीओ