सिनेमा पडद्यावर आपल्या अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांची मनं जिंकणारे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ आता एका जाहिरातीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने या तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पान मसाला आणि संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिरातींवर निर्बंध असल्याने अनेक कंपन्यांनी सरोगेट अॅडव्हर्टायझिंगचा मार्ग निवडला. मात्र या जाहिरातींद्वारे मूळ तंबाखूजन्य ब्रँडचीच प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे.