मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. जरांगेंनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपसंदर्भात या भेटीत चर्चा करण्यात आलीय. सरकारला बदनाम करणारी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला असून ऑडिओ क्लिप प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय.