जळगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी रेश्मा काळे यांना निवडणुकीतून माघार घेण्याच्या सूचना दिल्या.. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन जळगावात होते मात्र सकाळपासूनच रेश्मा काळे नोटरीचेबल होत्या... जळगावमध्ये महायुतीच्या बैठकींमध्ये खलबत सुरू असतांना रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.. एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान रेश्मा काळे यांच्यासोबत त्यांचे पती कुंदन काळे आणि शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे ही उपस्थित होत्या.