डोंबिवलीत अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. नवरात्रीच्या भंडाऱ्यात जेवण करायला गेलेला 13 वर्षाचा मुलगा नाल्याचे झाकण उघडे असल्याने नाल्यात पडला. मुलाचे आई-वडील मदत मागत होते पंरतु असंवेदनशील असलेले लोक जेवण करण्यामध्ये मग्न होते. अखेर दोन तासानंतर एका तरुणाने उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढले परंतु या 13 वर्षीय मुलगा आयुष कदम याचा उपचारा आधीच मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधा कारवाईची मागणी केली जातेय. एवढेच नाही आयुष्याच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.