अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशिया दौऱ्यावर असून, त्यांनी भारताचे शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष थांबवण्याचा मोठा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सीमा विवादावर ते तोडगा काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 'हे युद्ध थांबवणे माझ्यासाठी सोपे आहे,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव आणि त्यांच्या आशिया दौऱ्याकडे जगाचे लक्ष वेधले आहे.