बहुतांश सर्व निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट आता पक्षसंघटना बळकट करण्याच्या कामाला लागलाय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाचे विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेतली.. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR मोहिमेसाठी बूथस्तरावरील BLA नेमणूका आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यावर शिंदेंनी या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केलं... तसंच तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा, आणि पक्षवाढीसाठी सातत्याने सक्रिय राहण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकार्यांना दिल्यात.