संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराख करण्याचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधात नियोजित लष्करी कारवाई तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.इराणने 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचे मान्य केल्यास, अमेरिका पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्बहल्ला आणि लष्करी कारवाई थांबवण्यास तयार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.इराणकडून अमेरिकेला १० कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झाला असून, चर्चेसाठी हा एक व्यवहार्य आधार असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. अमेरिका आणि इराणमधील वादाचे बहुतांश जुने मुद्दे आता निकाली निघाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन आठवड्यांचा कालावधी हा प्रलंबित चर्चांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि त्याची अधिकृत अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे