Beed मध्ये एकटेपणाच्या भावनेतून तरुणानं संपवलं जीवन, मित्रांसोबत झालेल्या वादातून उचललं पाऊल

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या एकटेपणाच्या भावनेतून 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने घराच्या छतावर विषारी औषध प्राशन केले. रात्री कुटुंबीयांना तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी मोबाईलवर टाकलेल्या भावनिक स्टेटसमुळे एकटेपणाची वेदना समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ