नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराची गंभीर प्रकरणं उघडकीस आलीय... याप्रकरणी धार्मिक भावना दुखावणे, बलात्कार, विनयभंग असे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत.. तर आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलीय.. दरम्यान, प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आलीय.