Satara ZP अध्यक्षा प्रिया शिंदेंच्या अडचणीत वाढ, शिंदेंच्या कुणबी दाखल्याला कायदेशीर आव्हान

सातारा झेडपी अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यांच्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलंय..प्रिया शिंदे यांच्या विरोधात तक्रारदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सादर केलेले 'कुणबी' जातीचे प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्या विरोधात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल करण्यात आलीय.. ​वकील दत्तात्रय घोडके यांनी याप्रकरणी तक्रारदारांच्या वतीने वकीलपत्र सादर केलंय.. जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ​जिल्हा परिषद अध्यक्षपदी असलेल्या प्रिया शिंदे यांनी मिळवलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे नियमांना हरताळ फासून आणि घाईघाईत मिळवले असल्याचा दावा करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ