पुण्यात गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हिंदू जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवला. बोपदेव घाटात सार्वजनिक ठिकाणी नमाज पडल्याच्या विरोधात बाईक रॅलीच्या माध्यमातून हा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी नमाज पढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. ही बाईक रॅली पुण्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती. आणि तिथे गोपीचंद पडळकर सभाही घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी ही बाईक रॅली रोखलीय.