गणेशोत्सव एवघ्या एका आठवड्यावर आला आहे. गणपती उत्सवाला गावी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांची लगबग आता सुरु झाली आहे. अशातच वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार असून अटल सेतू तसेच समृद्धी महामार्गावरुन टोल फ्री प्रवास करता येणार आहे.