सोलापूरमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत आरोपींना अटक करून कार्यकर्त्याची सुटका केली आहे.