मुंबईतील वरळी परिसरात एका भरधाव कंटेनरने सेंच्युरी बाजारजवळच्या बस स्टॉपला जोरदार धडक दिल्याने एक विचित्र अपघात झाला. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.