Rave Party | ...तर जावयाला फाशी द्या! Pranjal Khewalkar प्रकरणी Eknath Khadse असं का म्हणाले?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा सहभाग असल्यामुळे मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला. या गंभीर आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांचा जावई दोषी आढळला, तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी. याबरोबरच, त्यांनी चाकणकर यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे. खडसे यांनी पोलिसांना निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ