अहिल्यानगरमध्ये पूर! अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर शहरात सीना नदीला पूर आला आहे. वारुळ येथील मारुती दातरंगे मळा या परिसरात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी महापालिकेचे बचाव पथक (प्रमुख: शंकर मिसाळ) घटनास्थळी दाखल झाले आहे.