कुख्यात गँगस्टर डी के राव याला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. खंडणीच्या (Extortion) गुन्ह्याखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाणार असून, या अटकेमुळे मुंबईच्या गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.