छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधीच महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 'अजित पवार गट सोबत नको' अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिंदे सेनेसोबत जुळेल पण राष्ट्रवादी (अजित पवार गट) नको, असं मत व्यक्त केलं आहे.