बीडमध्ये (Beed) दोन तरुणांनी क्षुल्लक कारणावरून गुरुकुलच्या ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली आहे. त्यांनी गुरुकुल चालकाच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांत दोन तरुणांवर गुन्हा दाखल झाला असून, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.