नागपुरात अवैध पिस्तूल जप्त! नागपूर गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाने २३ वर्षीय नदीम अन्सारी याला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. आरोपीने हे अग्निशस्त्र मध्य प्रदेशातील (छिंदवाडा) अर्जुन नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले आहे. अवैध शस्त्रास्त्रांमागे पुन्हा मध्य प्रदेशचे कनेक्शन समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.