Maharashtra Rain | राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत 'अतिवृष्टी'चा इशारा

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी! कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका आणि घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व जिल्हा प्रशासनांना नियंत्रण कक्ष २४x७ सुरू ठेवण्याच्या, Flash Flood वर लक्ष ठेवण्याच्या आणि नदीच्या प्रवाहावर सतत देखरेख ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ