पूरस्थितीत गरबा! अमरावतीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरब्याला हजेरी लावल्याने त्यांच्यावर ठाकरे गटाकडून सडकून टीका होत आहे. अमरावतीचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे म्हणाले की, एका बाजूला राज्य पुरात बुडाले असताना, बावनकुळे एकाही शेतीच्या बांधावर गेले नाहीत. शेतकरी अडचणीत असताना पालकमंत्र्यांनी गरब्याच्या ठिकाणी जाणं योग्य नाही, म्हणून त्यांनी 'संवेदनशील पालकमंत्र्यांचा निषेध' केला आहे.