जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. डोंगरी आणि तितुर नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले. शहरातील हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अग्निशमन दलाने रात्रभर गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.