भारत-पाक महामुकाबला! भारतीयांसाठी आज 'सुपर संडे' आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज तिसऱ्यांदा, थेट फायनलमध्ये आमनेसामने येत आहेत. भारत एकाच स्पर्धेत पाकिस्तानवर विजयाची हॅट्रिक साधून चषकावर नाव कोरणार का, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.