शिर्डीत धुवांधार पाऊस! शिर्डीत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कालिकानगर भागात अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरले. पाणी साचल्यामुळे नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली. कालिकानगर भागातील मुख्य गल्ली पूर्णपणे तुंबल्याचं चित्र आहे.