फ्रान्सला झालंय तरी काय असा प्रश्न पडू लागलाय. कारण अवघ्या २७ दिवसांत फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा नवा पंतप्रधान नियुक्त करण्याची वेळ अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्यावर आलीय. विशेष म्हणजे लेकोर्नू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आणि काही तांसांतच आपला राजीनामा दिला.. त्यामुळे फ्रान्समध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता तर निर्माण झालीच आहे शिवाय याचा परिणाम आधीच संकटात असलेल्या फ्रेंच अर्थव्यवस्थेवरही दिसून येतोय. पाहूया फ्रान्समध्ये नेमकं काय सुरूय. पंतप्रधानांचे राजीनामे का पडत आहे. का सरकार कोसळतंय. अध्यक्ष माक्राँ यांच्या अडचणी वाढल्यात का.. एक ग्लोबल रिपोर्ट....