माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाकांक्षी योजना थंड बस्त्यात पडल्याची चर्चा आहे. 'आनंदाचा शिधा' नंतर आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेवरही लाल फुल्ली मारण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात ही योजना का थांबवली गेली, यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध आहे का?