सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर सराफा बाजारात आज पुन्हा तेजी आलीय.. तीन दिवस सतत घसरण झाल्यानंतर आज सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झालीय.. सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याचे भाव 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचले आहेत... तर चांदीच्या दरातही 5 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली असून चांदी 2 लाख 66 हजार रुपयांवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या चढ-उतारासह वाढलेली गुंतवणूक मागणी यामुळे मौल्यवान धातूंवर परिणाम होत असून परिणामी सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाल्याचे मत सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.